नाशिक: सप्टेंबर उजाडला असतानाही राज्य शासनाकडून जिल्ह्याला महसूल उद्दिष्टाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यस्तरावरून महसुलाचे लक्षांक प्राप्त झालेले नसले तरी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. पाच महिन्यांत गौण खनिज आणि जमीन महसूलमधून ७३ कोटी ७६ लाख ६४ हजार रुपयांची वसुली पूर्ण केली आहे.