Nashik district revenue collection affected by elections
Sakal
नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रणधुमाळीचा थेट फटका महसूल वसुलीला बसला असून, चालू आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या महसूल उद्दिष्टांच्या केवळ ३७ टक्केच वसुली झाली आहे.
डिसेंबरअखेर प्रशासनाला अवघे १७८ कोटी नऊ लाख रुपयेच तिजोरीत जमा करता आले आहेत. उर्वरित २९९ कोटींची वसुली अवघ्या तीन महिन्यांत करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.