Nashik News : जिल्‍हा प्रशासनाकडून 155 कोटींचा महसूल गोळा!

Revenue Collection
Revenue Collectionesakal

नाशिक : राज्‍य सरकारतर्फे जिल्‍हा प्रशासनाला दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्‍या अनुषंगाने यंत्रणा कसोशीने प्रयत्‍न करण्यात येत आहे. डिसेंबरअखेरीपर्यंत १५५ कोटी ३६ लाख ६१ हजार रुपये इतका महसूल गोळा केला आहे. (Revenue collection of 155 crores from district administration Nashik News)

२०२२-२३ या आर्थिक वर्षांकरिता राज्‍य शासनाने जिल्‍हा प्रशासनाला १९३ कोटी ६६ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिलेले होते. याअंतर्गत जमीन महसुलचे ९५ कोटी ५० लाख आणि गौण खनिजापोटी ९८ कोटी १६ लाखांचे उद्दिष्ट दिलेले होते. महसुलाचा आढावा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्‍या माध्यमातून दर आठवड्याला घेतला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार डिसेंबर अखेरपर्यंत प्रशासनाने १५५ कोटी ३६ लाख ६१ हजार रुपये महसूल शासनाच्‍या तिजोरीत टाकला आहे. यामध्ये गौणखनिजच्या ११० कोटी ६५ लाख ९७ हजार रुपये इतका महसूल असून, उद्दिष्टाच्‍या तुलनेत हे प्रमाण ११३ टक्‍के आहे. जमीन महसुलाच्या ९५.५० कोटींच्‍या उद्दिष्टांपैकी ४४ कोटी ७० लाख ६४ हजार रुपयांचा महसूल गोळा झाला असून, हे प्रमाण ४७ टक्‍के आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Revenue Collection
Mission Zero Dropout : वीटभट्टीवरील स्थलांतरित मुले शिक्षणाच्या प्रवाहात!

उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी तीन महिन्‍यांचा अवधी जिल्‍हा प्रशासनाला मिळणार आहे. त्यामुळे गत तीनवर्षांप्रमाणे यंदाही निर्धारित महसूल शासनाच्‍या तिजोरीत भरला जाईल, असा विश्‍वास जिल्‍हा यंत्रणेकडून व्‍यक्‍त होत आहे.

सिन्नर, नांदगाव आघाडीवर

महसूल गोळा करण्याबाबत सिन्नर व नांदगाव तालुका आघाडीवर आहेत. सिन्नरचे ११८ टक्‍के तर नांदगाव तालुक्‍याची उद्दिष्टपूर्ती ११६ टक्के झालेली आहे. निफाडला अवघी १०.३४ टक्‍के इतकीच निच्चांकी वसुली पूर्ण केलेली आहे.

Revenue Collection
Nashik News : श्री शिवपुराण कथेनंतर मालेगावच्या बसस्थानकात उसळला प्रवाशांचा जनसागर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com