Revenue Department Strike
sakal
नाशिक: महसूल मंत्र्यांकडून विधिमंडळात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या घोषणा आणि महसूल विभागाच्या प्रलंबित मागण्यांसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवार (ता. १९)पासून बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा नाशिक विभाग महसूल अधिकारी व कर्मचारी महासंघाने केली. यापूर्वीच ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा (तलाठी) संप सुरू असताना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे विभागाचे कामकाज ठप्प होणार आहे.