Nashik Revenue Week: जिल्ह्यात उद्यापासून महसूल सप्ताह : जिल्हाधिकारी जलज शर्मा

Jalaj Sharma
Jalaj Sharmaesakal

Nashik Revenue Week : महसूल विभागातर्फे दरवर्षी आपल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा होतो.

यंदा जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या महसूल सप्ताहात प्रत्येक दिवशी कार्यक्रम होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. (Revenue week in district from tomorrow Collector Jalaj Sharma nashik news)

महसूल सप्ताह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी अशा समाजातील घटक आणि विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून साजरा करावा, असेही श्री. शर्मा यांनी स्पष्ट केले.

७ ऑगस्टला महसूल सप्ताहाची सांगता होईल. त्यात महसूलतर्फे सप्ताहात राबविलेल्या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेतली जाईल.

सप्ताहांतर्गतचे कार्यक्रम असे : १ ऑगस्ट- २६ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ मधील महाराजस्व अभियानांतर्गतच्या कामाची दखल घेऊन विभागनिहाय उत्कृष्ट काम करणारे अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलिसपाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी म्हणून गौरव करून सन्मान.

२ ऑगस्ट- युवा संवाद- दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्जदारांनी दाखल केलेले व प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढून संबंधित अर्जदारांना सदर दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण.

३ ऑगस्ट- एक हात मदतीचा कार्यक्रम- मॉन्सून कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे, फळबागांचे, जनावरांच्या झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमामधील तरतुदीनुसार बाधित नागरिकांना देय असलेल्या सोयी-सुविधा, नुकसान भरपाई देण्याबाबत आढावा घेणे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalaj Sharma
Bhujbal on Kesarkar: देवाचा धावा करा अन आमची भरू द्या धरणे; भुजबळांचा केसरकरांना उपहासात्मक टोला

तसेच, खरिपातील पिकांचे विमा उतरविण्यासाठी अर्जदारांच्या मागणीनुसार पीक पेरा अहवाल, सातबारा व ८-अ असे तलाठीस्तरावरून देय असलेले विविध दाखले देणे. जनसंवाद.

४ ऑगस्ट- महसूल अदालत होईल. प्रलंबित असलेली प्रकरणे, अपील निकाली काढण्यात येईल. तसेच, सलोखा योजनेंतर्गत गाव व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडल अधिकारीस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी तलाठी कार्यालयांतर्फे शिबिर होईल.

जमीनविषयक आवश्यक नोंदी अद्ययावत करण्याबाबत प्राप्त अर्जावर कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येतील. ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरील तक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढण्यात येतील.

५ ऑगस्ट- सैनिकहो तुमच्यासाठी कार्यक्रम- राष्ट्रीय सुरक्षिततेच्या सीमावर्ती, अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असणारे महसूलचे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळण्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येईल.

संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही आणि संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

६ ऑगस्ट- महसूल संवर्गात कार्यरत, निवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद कार्यक्रम- महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवांविषयक बाबी निकाली काढण्यात येतील. त्यांच्या सेवाविषयक बाबींचे समाधान करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन होईल.

Jalaj Sharma
Nashik: त्र्यंबकेश्‍वर दर्शनाच्या 200च्या पावतीसाठी 2 तास रांगेत! उत्तर महाद्वारसमोर रस्त्यामध्ये दुहेरी रांग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com