Nashik News: भातशेती रूतली मजुरीच्या चिखलात! इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात मजुरांची चणचण

एका मजुरासाठी मोजावे लागताहेत ३०० ते ३५० रुपये
rice sowing
rice sowingesakal

Nashik News : भाताचे आगार तसेच पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने काही दिवसांपासून दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच गाव व वाड्यपाड्यांमध्ये भातलावणीच्या कामांना वेग आला आहे.

इगतपुरी तालुक्यात १२४ महसुली गावे आणि १५० हून अधिक पाडे आहेत. तालुक्यात दर वर्षी ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भाताची लागवड केली जाते.

येथील शेतकरी सुरती, गुजरात ११, गुजरात थाळी, रत्ना, सुवर्णा, कर्जत, इंद्रायणी, सह्याद्री, सोनम हाळी, आर २४, जीओ, एक हजार आठ, राधा फुले आणि मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड केली जाते. येथील इंद्रायणी हा भाताचा वाण प्रसिद्ध आहे. (Rice farming in trouble lack of Labor in Igatpuri Triambakeshwar taluka Nashik News)

या तालुक्यात एकेकाळी मोठ्या संख्येने मजूर होते. काही वर्षापासून या तालुक्यात उद्योगधंदे नसल्यामुळे शेकडो मजूर शहरी भागातील कारखान्यात काम करण्यासाठी स्थलांतर करतात.

त्यामुळे पावसाळ्यात मिळणारे मजूर रोजगार मिळत नसल्याने भातपिकाची लागवड कशी करायची, असा प्रश्न दरवर्षी येथील शेतकऱ्यांना पडतो. यंदा मात्र लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे नियोजन बिघडल्यामुळे मजुरांची चणचण भासत आहे.

भात लावणीसाठी जिल्ह्यात कुठेही यांत्रिक अवजारे नाहीत. भात लावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे परंपरेनुसार शेतातील देवांना पोळी भाजीचा नैवेद्य देऊन शेतकऱ्यांनी कामांना सुरुवात केली.

मात्र एकाच वेळी लावणीच्या कामांना सुरवात झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे खर्डी, शहापूर, कसारा, आसनगाव, उंबरमाळी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

rice sowing
Ganeshotsav 2023: कारागृहाच्या महसुलात होणार वाढ! कैद्यांनी तयार केलेल्या मूर्ती पाहण्यासाठी लगबग

मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. एका शेतमजुराला रोज ३०० ते ३५० रुपये आणि जेवणाचा खर्च द्यावा लागतो. यामुळे शेती जास्त कष्टाचा आणि खर्चिक झाला आहे. त्यामुळे भातशेती करणे परवडत नाही.

या वर्षी ३० ते ४० टक्के पेरभात शेती झाली आहे. भात पेरणीच्या वेळेवरच शेताची चांगली मशागत करून पेरभात शेतात टाकले जाते. त्याला पुन्हा लावण्याची गरज नसते. हे काम कमी मनुष्यबळातही होते.

तालुक्यातील अनेक शेतकरी वर्षभर खायला लागेल एवढी भातशेती करतात. त्यामुळे उर्वरित ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. भाताचे भाव अनेक वर्षापासून आहेत तेच आहेत. त्यामुळे महागलेली भातशेती सद्यःस्थितीत परवडत नाही.

सध्या शेतकरी पारंपरिक पद्धतीला छेद देत आधुनिक शेतीकडे वळला आहे. शेतकरी आता मल्चिंग शेती, एस.आर. टी एस.आर.आय, डम सीडर, बावचा, वापे पद्धतीची भातशेती करत आहे. तालुक्यात एसआरटी भातशेती सुमारे ५० एकर तर मल्चिंग सहा ते सात एकर क्षेत्रात केली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

rice sowing
SAKAL Exclusive: वरुणराजा अजूनही रुसलेलाच! जिल्ह्यातील अवघ्या 12 मंडळांत गाठली सरासरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com