Success Story : रिक्षाचालकाच्या लेकीला मिळाले 8 लाखांचे पॅकेज | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogita Kahandal with parents.

Success Story : रिक्षाचालकाच्या लेकीला मिळाले 8 लाखांचे पॅकेज

येवला (जि. नाशिक) : वडील शिर्डी येथे रिक्षा चालवून कुटुंब चालवितात. आमच्या घरात मीच सर्वांत मोठी असून, मला तीन लहान बहिणी आहेत. संजीवनीमुळे मी शिकले असून, मला आठ लाख पॅकेजची नोकरी मिळाली. हळूहळू मी आता वडिलांचे रिक्षा चालविणे थांबविणार आहे आणि माझ्या तीन बहिणींनाही शिकविणार आहे, ही प्रतिक्रिया आहे अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन मोठे पॅकेज मिळवलेल्या रिक्षाचालकाची मुलगी योगिता कहांडळ हिची! (rickshaw driver daughter yogita kahandal received package worth 8 lakhs nashik Success Story Latest Marathi News)

कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध विद्या शाखांमध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या ३४ नवोदित अभियंत्यांना कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह अंतर्गत भरघोस पॅकेजवर निवड केली आहे. त्यात योगिताचाही समावेश आहे.

ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट विभागातर्फे झालेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये क्रिप्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीने १३ नवोदित अभियंत्यांना सुरवातीस आठ लाखांचे वार्षिक पॅकेज देवुऊ करून नोकऱ्यांसाठी निवड केली, तर परसिस्टंट सिस्टिम्स या कंपनीने तब्बल २१ अभियंत्यांना सुरवातीस ४.७१ लाखांचे वार्षिक पॅकेज देत निवड केल्याचे संजीवनी शिक्षणसमूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik : जिल्ह्यात लम्पी आजारावर प्रतिबंधक लस उपलब्ध

क्रिप्ट इंडिया कंपनीत अक्षय शिरसाठ, पायल पटेल, विवेक दुबे, धवल जोशी, श्रृती जावळे, योगिता कहांडळ, अभिषेक बेताल्लु, आकाश चौधरी, कल्याणी गायकवाड, कृष्णा गुडदे, महेश काळे, तृप्ती चिकणे व सचिन धट यांची निवड झाली, तर परस्टिंट सिस्टिम्स या कंपनीने विशाल आगळे, पंकज डहाळे, सागर गायकवाड, अमृत जठार, प्रजेत खुळे, अम्रत मोरे, अक्षदा पानगव्हाणे, सार्थक शिरडकर, सोमेश केवारे, मिहिर खंडेलवाल, निकिता मारवाडी, केतकी भिरूड, ज्ञानेश्वरी चौधरी, साक्षी डांगे, वैभव जगधने, अश्विनी काळे, ऋषिकेश माने, परवेज शेख, ललित नागुडे,अभिषेक कर्जुले व स्नेहा तुकाराम यांची निवड केली. निवड झालेले सर्व अभियंते ग्रामीण भागातील आहेत. संजीवनी शिक्षणसमूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन केले.

"संजीवनी शिक्षण संकुलात अनेक नवोदित अभियंते तयार होत असून, या अभियंत्यांना नामांकित कंपन्यांत नोकरी मिळवून देण्यात आम्ही आघाडी घेतली आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचीही आम्ही काळजी घेतो. संजीवनी अभियांत्रिकीत घेत असलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील नवोदित अभियंते वयाच्या २०- २२ व्या वर्षीच कुटुंबाचा आधार बनत असल्याचा आनंद आहे. "- अमित कोल्हे, कार्यकारी विश्वस्त, संजीवनी शिक्षण संकुल.

हेही वाचा: नाशिक टपाल कार्यालयात 200 कोटीचे क्लेरिंग हाउस : संदेश बैरागी

Web Title: Rickshaw Driver Daughter Yogita Kahandal Received Package Worth 8 Lakhs Nashik Success Story Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..