Nashik Citylinc Protest: संपामुळे रिक्षाचालकांची चांदी; क्षमेतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक

Passengers occupying more front seats than the capacity of the rickshaw
Passengers occupying more front seats than the capacity of the rickshawesakal

Nashik Citylinc Protest: सिटीलिंक वाहकांच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली. यामुळे बसस्थानकाचा ताबा रिक्षाचालकांकडून घेण्यात आला. सीबीएस, शालिमार, द्वारका बसस्थानकांस रिक्षाचा गराडा पडला होता. (rickshaw Transport with more passengers than capacity nashik news)

बुधवारी (ता.२२) सिटीलिंक वाहकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला. रस्त्यांवर बस धावू शकल्या नाही. सणासुदीचे दिवस सुरू आहे. त्यानिमित्ताने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांकडून गर्दी केली जात आहे. तसेच खासगी, सरकारी चाकरमान्यांचे जाणे- येणे सुरू झाले आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यासाठी नागरिकांकडून रिक्षाचा आधार घेतला जात होता.

याची संधी साधत रिक्षाचालकांनीही बसस्थानकाचा ताबा घेतला. प्रत्येक रिक्षा प्रवासी भरून जाताना दिसत होता. अतिरिक्त कमाई व्हावी, यासाठी रिक्षा चालकांकडून प्रवासी वाहतूक नियमांचे धिंडवडे काढत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करत होते.

Passengers occupying more front seats than the capacity of the rickshaw
Nashik Citylinc News: चालक, वाहकांना मुक्कामाची सोय देणे सिटीलिंक कंपनीला बंधनकारक

प्रवासीही जीव धोक्यात घालून रिक्षाचालका शेजारी तसेच रिक्षाच्या मागील भागातही अतिरिक्त प्रवासामध्ये बसून प्रवास करताना बघावयास मिळाले.

रिक्षा चालकांकडून नेहमीपेक्षा जास्त रक्कम जरी आकारण्यात आली नसली तरी प्रवाशांची संख्या मात्र क्षमतेपेक्षा अधिक वाढवली. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळताना दिसून आले. विशेष म्हणजे पोलिसांचेदेखील याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसले. मुख्य बाजारपेठ, नाशिक रोड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा ओढा यांच्याकडून शालिमार, सीबीएस आणि द्वारका बस स्थानकाचा वापर केला जात असल्याने या तीनही बसस्थानकास रिक्षाचा गराडा पडला होता.

Passengers occupying more front seats than the capacity of the rickshaw
Nashik Citylinc Protest: सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प! 2 वर्षात सातवा संप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com