Nashik Crime : धुम स्टाईलने आले अन् गळ्यातील सोने चोरून नेले

Unknown motorcycle thieves caught on CCTV at Sarawadi Road
Unknown motorcycle thieves caught on CCTV at Sarawadi Roadesakal

Nashik Crime : दिवसान दिवस शहरात चोरीचे प्रकार वाढत आहेत. अनेक उपाययोजना करूनही चोरटे आपली चोरी करण्यात यशस्वी होत आहे. त्यातच धूम स्टाईलने जवळ येऊन सोने ओर बाडणे हे नित्यनेमाचे झाले आहे. अशीच घटना शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अर्थात सरदवाडी रोड येथे घडली. (riding bike chain snatching caught in cctv nashik crime news)

सकाळी सावजी खानावळीच्या संचालिका ज्योती कमलाकर कोथळे या सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या घराकडून सावजी खानावळ या आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जात असताना, सरदवाडीकडील ब्रिजच्या दिशेने एक मोटार सायकल हॉटेल हेवन इनच्या समोर उभी करून मोटार सायकल वरील एक अनोळखी इसम सौ. कोथळे यांच्या जवळ येऊन हिंदीत संभाषण करू लागला.

या ठिकाणी खुन झाला असून आपण इतकं सोनं का घातले आहे? मोटरसायकलवर असणारे साहेब काय बोलत आहे ते बघा असे म्हणत कोथळे यांना मोटर सायकलकडे घेऊन गेले. आणि त्यांना सोन्या संदर्भात बोलत‌ करून सोन काढून ठेवण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Unknown motorcycle thieves caught on CCTV at Sarawadi Road
Crime news : व्याघ्र प्रकल्पातील टायगर पॅराडाईज रिसॉर्टवर पोलिसांचा छापा

कोथळे यांनीही आपली २ तोळ्याची पोत आणि हातातील एक तोळ्याची अंगठी काढून पाकिटात ठेवत असताना त्यातील एका भामट्याने सदर पाकीट सोन्यासह हिसकावले. कोथळे यांनी त्याला प्रतिकार केला मात्र त्यांना पाठीचा त्रास असल्यामुळे त्या त्याला फार काही प्रतिकार करू शकल्या नाही.

याचाच फायदा घेत या चोरांनी तेथून काळया रंगाच्या पल्सर वर हेल्मेट परिधान करत पळ काढला. तरी सरदवाडी रोड येथे अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये हे अज्ञात चोरटे कैद झालेले असून त्यांना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Unknown motorcycle thieves caught on CCTV at Sarawadi Road
Ichalkaranji Crime : घटस्फोटासाठी न्यायालयात का अर्ज केला? रागातून पत्नीवर कुऱ्‍हाडीनं हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com