आत्‍ममनोबलाच्‍या जोरावर रिमा पंजवानींची कर्करोगावर मात; महिलांसाठी प्रेरणा

Reema Panjwani
Reema Panjwaniesakal

साधारणतः पाच वर्षांपूर्वी रिमा पंजवानी यांना स्‍तनांचा कर्करोगाचे निदान झाले. आजारपणाचे सत्‍य स्वीकारताना त्‍यांनी लागलीच उपचाराला सुरवात केली. सहा महिन्‍यांच्‍या उपचारानंतर त्‍यांनी कर्करोगावर यशस्‍वी मात केली. या कालावधीत आत्‍ममनोबल अत्‍यंत महत्त्वाचे ठरल्‍याची भावना श्रीमती पंजवानी यांनी व्‍यक्‍त केली. (Rima Panjwani overcome breast cancer through self discipline Inspiration for women Nashik Latest Marathi News)

Reema Panjwani
Nashik : प्लॅस्टिक फुले विक्रीचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादासमोर

पन्नाशीच्‍या आत कर्करोगाचे निदान झाल्‍यानंतरही श्रीमती पंजवानी घाबरून गेल्‍या नाहीत. कर्करोगाबाबत जागृक असल्‍याने, स्‍तनात छोटीशी गाठ आढळताच त्‍यांनी तपासण्या केल्‍या. प्राथमिक स्‍तरावर स्‍तनांच्‍या कर्करोगाचे निदान झाले व त्‍यांनी क्षणाचा विलंब न करता उपचाराला सुरवात केली. एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये डॉ. राज नगरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली त्‍यांनी उपचार सुरू केला.

यादरम्‍यान केमो थेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया, अशा विविध पातळ्यांवरील उपचार घेताना त्‍यांनी कर्करोगावर यशस्‍वी मात केली. उपचारादरम्‍यान केमो थेरपीनंतर तीन ते चार दिवस अशक्‍तपणा जाणवला. मात्र, कर्करोगाचा हिंमतीने सामना करताना, त्‍यांनी आत्‍ममनोबल कायम राखले. उपचार सुरु असताना, तणाव हलका करण्यासाठी गोव्‍यात सहलही काढली, तर उपचार पूर्ण झाल्‍यानंतर बँकॉकला पर्यटनासाठी भेट दिली.

सध्याच्‍या परिस्‍थितीत महिलांनी जागृक राहण्याची आवश्‍यकता आहे. तसेच स्‍तनात गाठ किंवा अन्‍य काही लक्षणे आढळल्‍यास तातडीने डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली तपासण्या करून घेण्याचा सल्‍ला श्रीमती पंजवानी देतात. तसेच कर्करोगाला घाबरण्याची आवश्‍यकता नसून, हिंमतीने मुकाबला करायला हवा, असे त्‍या आवर्जून सांगतात.

Reema Panjwani
Nashik : तुरुंगाधिकाऱ्यावरच आली कैदी होण्याची वेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com