Nashik Ring Road
sakal
नाशिक: सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या ४७.९० किलोमीटरच्या परिक्रमा मार्गाला (रिंगरोडला) केंद्रीय रस्ते व महामार्ग विभागाने मान्यता दिली आहे. प्रकल्पासाठी पाच हजार ८०५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यात भूसंपादनाकरिता दोन हजार ६४९ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, त्यामुळे परिक्रमा मार्गाच्या उभारणीत हे सकारात्मक पाऊल पडले आहे.