Kumbh Mela
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भाविक सात मार्गांनी शहरात येणार असल्याने भाविकांच्या सुविधेसाठी भूसंपादनासह अंतर्गत रिंगरोड विकसित केला जाणार आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. जुने २०२७ पर्यंत रिंगरोड पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सदर रिंगरोड सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जाणार आहे.