तापमानवाढीमुळे मधमाश्‍यांचे अस्तित्व धोक्यात; पिकांमध्ये सरासरी २६ टक्के उत्पादन घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 bee

तापमानवाढीमुळे मधमाश्‍यांचे अस्तित्व धोक्यात!

नाशिक : अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक व परपरागीभवनाच्या सहाय्याने पिकांची गुणवत्ता वाढविणाऱ्या मधमाश्‍यांचे जागतिक तापमानात (global temperature) सातत्याने होत असलेली वाढ, पिकांमधील रासायिकन औषध फवारणीमुळे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. ‘एन्टोन जान्सा’ या प्रसिद्ध मधमाशीतज्ज्ञाने या क्षेत्रात काम केल्यानंतर जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डिया), अन्न व कृषी संघटना (FAO) यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने २० मेस हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला. (Rising global temperature rise have threatened bee exitance Nashik News)

मधमाशा त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलांतील मकरंद व पराग गोळा करतात. माणसाला अन्न वनस्पतीपासून मिळत असले तरीही मधमाशा यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र आज या मधमाश्‍यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे सर्वत्र वाढलेली उष्णता, मधमाश्‍यांच्या वस्तीला लायक वने आणि वृक्षचीही कमी झालेली संख्या, मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या लहरी, मधमाश्यांविषयी अज्ञानामुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे. सर्वेक्षणानुसार भारतात कमी होत चाललेल्या परागीभवन करणाऱ्या सजीवांच्या कमी संख्येमुळे विविध पिकांमध्ये सरासरी २६ टक्के उत्पादन घट आढळली आहे. एकूण पिकांच्या १५ टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते, तर ८५ टक्के पिकांमध्ये परपरागीभवन दिसून येते.

संवर्धनाची गरज

अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे, की जर काही कारणांमुळे मधमाशा नाश पावल्या, तर सबंध मानवजात फार तर चार वर्षच जगू शकेल. कारण पुष्पधारी झाडे, वेली, वनस्पतींचे परागीभवन होणार नाही. यामुळे आज अन्नसाखळी फळझाडे, भाजीपाला यांची गुणवत्ता वाढीसाठी पोषक ठरणाऱ्या मधमाशी यांचे जतन व संवर्धन करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.

केंद्राकडूनही दखल

मधमाश्‍यां जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय मध मोहीम’ सुरू केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहिमेला विशेष प्रोत्साहन आणि प्राधान्य दिलेले आहे. महाराष्ट्र सरकारनेही जैविक मिशन राबविण्याची घोषणा केलेली आहे.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्युकोरमायकोसिस'चे इंजेक्शन मिळेना

...हे उपाय राबविण्याची गरज

- मधमाश्‍यांना उपयुक्त सपुष्प वनस्पतींची लागवड करावी

- विषारी कीटकनाशकांच्या फवारण्या पोळ्यावर करू नका

- मधमाशा शेतात असताना कीटकनाशकांचा वापर टाळावा

मधमाशी हे मानव आणि संपूर्ण सजीवसृष्टीला सर्वोत्तम वरदान आहे. मधमाशीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचून त्यांचे शास्रीयदृष्ट्या संरक्षण व संवर्धन केले तर परपरागीभवनाच्या सहाय्याने पीक उत्पन्नात वाढ होईल, त्याचबरोबर पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मदत होईल.

-प्रा. हर्षल पाटील, वरिष्ठ कार्यकारी (संशोधक आणि विकास विभाग, सल्फर मिल्स लिमिटेड)

हेही वाचा: लॉकडाउन ३१ मेपर्यंत, तरीही नाशिक जिल्ह्यात अनलॉकचे वेध

loading image
go to top