नाशिक: महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात अनेक सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नदीजोड प्रकल्प हा उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.