नाशिक: नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात आला असून, तो लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि जलसंपदा विभागांमध्ये समन्वयाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.