Crime
sakal
नाशिक रोड: गोरेवाडी परिसरात बहिणीच्या डोळ्यांदेखत भावाला जिवे ठार केल्याची घटना घडली. जुन्या भांडणातून ‘मला तुला सॉरी म्हणायचे आहे’ असा बहाणा करून बोलावून घेत धारदार शस्त्राने वार करून १९ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी दोन युवकांसह दोन विधिसंघर्षित अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.