नाशिक रोड- खड्ड्यांच्या विळख्यात सापडलेल्या नाशिक रोड बसस्थानकाच्या दुरवस्थेची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २३) खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. दुपारी जेसीबी, ट्रॅक्टर आणि मजुरांना पाचारण करून खड्डे दुरुस्तीचे सोपस्कार पूर्ण केले.