नाशिक रोड- पश्चिम महाराष्ट्राच्या मार्गावरील प्रवेशद्वार अशी ओळख असलेले नाशिक रोड बसस्थानक दोन वर्षांपासून खड्ड्यांनी खिळखिळे झाले आहे. या स्थानकाच्या दुरवस्थेला स्थानकावरील बससेवेचा भार आणि नियोजनकर्त्यांना लागलेली कुंभकर्णी झोप कारणीभूत ठरली आहे. अवघ्या २० बसची क्षमता असणाऱ्या नाशिक रोड बसस्थानकाच्या माथी ९०० बसफेऱ्यांचा भार टाकल्याने हे स्थानक खड्ड्यांत गेले आहे.