Couple
sakal
नाशिक रोड: मुंबई- हावडा एक्स्प्रेसखाली उडी घेऊन नाशिक रोड परिसरात प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १३) पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान जेल रोड- पवारवाडीच्या पुढे एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ घडली. या दोघांची ओळख पटलेली नसून, नाशिक रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण-तरुणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.