Food Safety
sakal
नाशिक रोड: दसरा, दिवाळीसह येणाऱ्या सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ, तेल, तूप आदींची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळी दर्जेदार, सकस अन्नपदार्थ नागरिकांना मिळावेत यासाठी राज्यभरात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ ही मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत नाशिक रोड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन तूप विक्रेत्यांवर विभागाने छापे टाकून लाखो रुपयांचे बनावट तूप जप्त केले आहे.