नाशिक: नाशिक रोड परिसरातील गोरेवाडीमध्ये एकाच रात्री दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून, यात अडीच लाखांचा, तर सातपूर बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. या तीन घरफोड्यांत चोरट्यांनी तब्बल साडेचार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. ऐनसणासुदीत वाढत्या घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.