Crime
sakal
नाशिक रोड: अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे प्रतिबंधित सुगंधित पान मसाल्याची निर्मिती आणि साठवणूक करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत सुमारे ७ लाख २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.