नाशिक- शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना महापालिकेचे अधिकारी जबाबदारी असून डिफेक्ट लायबिलिटी परेड (डीएलपी) चा कालावधी पाच वर्षांचा करताना अधिकारी व ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला. खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली आहे.