Road Dividers
sakal
नवीन नाशिक: अंबड लिंक रोड, विजयनगर, त्रिमूर्ती चौक, जुन्या सिडकोतील शिवाजी चौक, भाजी बाजार, माउली लॉन्स, अंबडगाव, कामटवाडे आणि हेडगेवार चौक यांसारख्या मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांना लागलेले रिफ्लेक्टर गायब झाले आहेत किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्री वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज न आल्याने लहान-मोठ्या अपघातांची शक्यता वाढली आहे.