Road Safety
sakal
नाशिक: अपघात टाळता येऊ शकतात. मात्र वाहतूक नियमांचे पालन करण्याची नितांत आवश्यकता आहे. वाहनांमुळे अपघात होत नाही तर, नियमांचे पालन न करता वाहन चालविणाऱ्यांमुळे ते होत असतात. त्यामुळे आपण आपल्या पालकांसमवेत प्रवास करीत असाल त्यांना हेल्मेट, सीटबेल्ट वापरण्यास सांगण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन निरीक्षक अभिजित वाघमारे यांनी केले.