NMC News: रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत वाहतूक नियंत्रणासाठी शहरात 22 वाढीव सिग्नलला मान्यता!

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ३३३ अपघातीस्थळांवर उपाययोजना
road signal
road signalesakal
Updated on

NMC News : शहरातून एकूण ७० किमीचा महामार्गावरील सहा सिग्नलचे नियंत्रण नियंत्रण महापालिकेकडे देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. गरवारे, पाथर्डी फाटा, वडाळा नाका, द्वारका, आडगाव नाका, औरंगाबाद नाका हे बंद असलेले सहा सिग्नल सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

शहरात २२ वाढीव सिग्नलला मान्यता देण्यात आली. (Road Safety Committee meeting approves 22 additional signals for traffic control in city Nashik News)

महापालिकेत शुक्रवारी (ता.३०) रस्ता सुरक्षा समितीची प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत शहरात सर्व्हेक्षण केलेली ३३३ अपघातस्थळ ब्लॅक स्पॉट होऊ नये यासाठी उपाययोजनांना करण्याचे ठरले.

महापालिकेत झालेल्या रस्ता सुरक्षा समिती बैठकीला पोलिस उपायुक्त (वाहतूक) मोनिका राऊत, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त विजयकुमार मुंढे, करुणा डहाळे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता शशांक अडके, संदीप विद्यापीठाचे डॉ. पी एल नाकतोडे, प्रो. शिशिर दधीच, सिव्हिल टेकतर्फे सी. एन. कुलकर्णी, ब्लूमबर्ग संस्थेचे निशांत सावंत, टी. के. जसवंत आदी उपस्थित होते.

झेब्रा क्रॉसिंग, पादचारी क्रॉसिंग, थर्मोप्लॅस्टिक पट्टे मारणे, गतिरोधक, कॅट आईस, वाहतूक मर्यादेचा फलक लावणे अशा विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. इंदिरानगर, राणेनगर येथील पुलाखालील बोगदा रुंदीकरणाचे काम सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

अस्तित्वातील बोगद्याची रुंदी वाढणार आहे. मुंबई नाका येथील सर्कलचा व्यास कमी करावा, अशी सूचना पोलिस उपायुक्त राऊत यांनी केली. त्यासाठी तज्ज्ञ एजन्सी म्हणून पवई आयआयटीची नेमणूक करून अभ्यासाद्वारे कार्यवाही करण्यात येईल, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

road signal
NMC Hoarding Audit : शहरात धोकादायक होर्डिंगची शोधमोहीम; 3 संस्थांवर जबाबदारी

मनपा करणार नियंत्रण

मनपाकडून लवकरच गरवारे, पाथर्डी फाटा, वडाळा नाका, द्वारका, आडगाव नाका, औरंगाबाद नाका हे बंद असलेले सहा सिग्नल सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पोलिसांकडून मनपाकडे वेळोवेळी शहरात २२ वाढीव सिग्नलची मागणी झालेली आहे.

आजच्या बैठकीतही गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्यावरील चौकांमध्ये सिग्नलची आग्रही मागणी केलेली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

सद्यःस्थितीत शहरात एकूण ५३ सिग्नल कार्यरत आहेत. त्यातील ४० स्मार्ट सिग्नल उभारणीची मंजुरी स्मार्टसिटीकडे आहे. त्यापैकी २० स्मार्ट सिग्नलचे काम प्रगतिपथावर आहे.

अतिक्रमण काढणार

रस्ते वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकातील अतिक्रमण हटविण्याबाबत डिमार्केशन नगररचना विभाग करून देणार असून त्यानंतर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई होणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

शहरातील होर्डिंग, दिशादर्शक फलक यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबतही बैठकीत चर्चा झाली. ८४५ पैकी ८४२ होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची सूचना करण्यात आली आहे.

रस्ता सुरक्षेसाठी सर्व्हेक्षण

नाशिक पूर्व – ६८

पश्चिम – ३६

पंचवटी - ८९

नाशिक रोड - ४८

सिडको– ६०

सातपूर – ३२

एकूण – ३३

road signal
NMC School Uniform: मनपा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मार्गी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com