Politics
sakal
नाशिक रोड: शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या प्रभागात राजकीय प्रवेशामुळे भक्कम दिसत असलेल्या भाजपकडे इच्छुकांची संख्या पाहता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तिकीट वाटपानंतर उमेदवारी न मिळालेल्या नाराजांच्या बंडखोरीचा फायदा इतर पक्षांना होण्याची शक्यता दिसून येत असल्याने अन्य पक्ष ‘वेट ॲन्ड वॉच’ वर आहे.