Nashik : चिखलात रुतले राऊत मळा परिसरातील रस्ते | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road covered in mud

Nashik : चिखलात रुतले राऊत मळा परिसरातील रस्ते

नाशिक : आडगाव परिसरातील राऊत मळा परिसराचा विकास झपाट्याने होत असला तरी मूलभूत सुविधांअभावी नागरिक त्रस्त त्रस्त आहे. या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने पाहणी करून तत्काळ सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. (Roads in Raut Mala area covered in mud Nashik Latest Marathi News)

आडगाव शिवारातील राऊत मळा परिसराचा झपाट्याने विकास होत असून, अनेक बहुमजली प्रकल्प तसेच बंगलोचे काम सुरू आहे. पण कोट्यवधी रुपयाचे डेव्हलपमेंट चार्जेसच्या माध्यमातून व घरपट्टीच्या माध्यमातून मनपा प्रशासनास उत्पन्न मिळत असतानादेखील प्रशासनाने या परिसराकडे दुर्लक्ष केले आहे, या परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण रखडल्याने रस्ते चिखलात रुतले आहे.

या परिसरातून लोकांना पाई चालणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे दुचाकीवरून घसरून अनेक छोटे-मोठे अपघात होत आहे. त्यामुळे अनेक लोकांना दुखापतदेखील झाली. यामुळे नागरिक संतप्त आहे.

याशिवाय अनियमितपणे येणाऱ्या घंटागाडीमुळे या परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसतो. अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरते. शिवाय डासांचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी अजूनही पथदीपदेखील बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकदा टवाळखोर आणि मद्यपी अंधाराचा फायदा घेऊन थांबतात.

हेही वाचा: ताहाराबाद ग्रामपंचायतीत गैरव्यवहार प्रकरण; सरपंच शीतल नंदन यांना अखेर अटक

अनेकदा तक्रारी करूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नाही. या ठिकाणी आडगाव म्हसरूळ शिवरस्त्याचे रुंदीकरण रखडलेले आहे. शिवाय राऊत मळा परिसरात अंतर रिंग रोड झालेलेच नाही. त्यामुळे या परिसराचा विकास कधी होईल, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.

मनपा प्रशासनाने आडगाव परिसरातील राऊत मळा येथील यशोदा गार्डन परिसर, कर्मयोगी नगर तसेच गट नंबर ५७७ ५७८ ५७९ ५८० ५६८ ५७२ या ठिकाणी असलेल्या रस्ते पाणी आणि पथदीप यांची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

"रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, सतत पाऊस सुरूच असल्याने अनेक वाहने स्लीप होतात. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. "

- अभिजित राऊत, अध्यक्ष, पंचवटी युवक विकास समिती.

हेही वाचा: Dhule : तलवारी नेणारे चौघे‍ गजाआड

Web Title: Roads In Raut Mala Area Covered In Mud Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..