जुने नाशिक- द्वारका भागातील वाहतूक पोलिस चौकीला लागून असलेल्या रस्त्याचे अर्धवट काम करण्यात आले होते. एका बाजूच्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून बंद होते. त्यामुळे तेथे अपघाताच्या घटना घडत होत्या. ‘सकाळ’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्याची दखल घेत त्वरित रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.