esakal | शस्त्राचा धाक दाखवून लुटली ७० हजारांची रोकड
sakal

बोलून बातमी शोधा

robbery 1.jpg

पेठ रोडवरील दत्तनगरमध्ये राहणारा विकेश सोमनाथ जाधव हा एका कॉस्मेटिक एजन्सीत अकाउंटंट म्हणून काम करतो. दिवसभर दुकानदारांकडून जमा केलेली रोकड घेऊन तो घराकडे दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून दुचाकीवरून पाठलाग करीत आले.

शस्त्राचा धाक दाखवून लुटली ७० हजारांची रोकड

sakal_logo
By
योगेश मोरे

नाशिक / म्हसरूळ : चोपडा पूल रस्त्याने धनदाई लॉन्ससमोरच्या रस्त्याने जाणाऱ्या युवकाची दुचाकी अडवून दोन ते तीन संशयितांनी शस्त्राचा धाक दाखवून खिशातील जवळपास ७० हजार रुपयांची रोकड जबरीने लुटून नेली. 

पेठ रोडवरील दत्तनगरमध्ये राहणारा विकेश सोमनाथ जाधव हा एका कॉस्मेटिक एजन्सीत अकाउंटंट म्हणून काम करतो. दिवसभर दुकानदारांकडून जमा केलेली रोकड घेऊन तो घराकडे दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून दुचाकीवरून पाठलाग करीत आलेल्या दोन ते तीन संशयितांनी जाधव याला रस्त्यात अडवून त्याला शस्त्राचा धाक दाखवून खिशातून जबरीने ७० हजार रुपये रोकड काढून घेतली, तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर युवकाने पोलिसांना माहिती कळविल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्यासह गुन्हा शोध पथक व गुन्हा शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

टोळक्याकडून दोघांना मारहाण
वाहन पार्क करण्याच्या वादातून टोळक्याने दोन भावांना लोखंडी टॉमीने बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनी परिसरात घडली. या घटनेत ट्रकचालक असलेले दोघे भाऊ जखमी झाले. सातपूर पोलिसांत चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. शाहरूख शरिफ खान, सलमान शरिफ खान (रा. दोघे सातपूर कॉलनी), शरिफ खान व फारूख अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. मंगेश ऊर्फ मंगल वाकडे (प्रबुद्धनगर, सातपूर) वाहन लोड करण्यासाठी सीएट कंपनी भागात गेले होते. त्या वेळी टोळक्याने त्यांना वाहन कंपनीच्या धक्यावरून बाहेर काढून वजन काट्याकडे लावण्यास सांगितले. मात्र, वाकडे यांनी नकार दिल्याने संशयितांनी त्यांना बेदम मारहाण केली.

संपादन : रमेश चौधरी

loading image
go to top