रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देत नाही, तोपर्यंत हलणार नसल्याचा निर्धार त्यांनी घेतल्याने, आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात अडकून पडले. काही कर्मचाऱ्यांनी तर सुटकेसाठी शाळेच्या भिंतीवरून उड्या मारून कार्यालयाबाहेर पडण्याचा थरारक प्रयत्न केला.