नाशिक- रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आयोजित बिऱ्हाड मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आदिवासी बांधवांना ईदगाह मैदानावर ठिय्या आंदोलन करावे लागले. या पार्श्वभूमीवर आदिवासी आयुक्तालय परिसरात मंगळवारी (ता. ८) रात्रीपासूनच कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.