गुलशनाबादमध्ये प्रेमाच्या प्रतीकास महागाईचे काटे! गुलाबाचे दर भीडले गगनाला : Rose Rates Hike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A rose flower sold in the flower market.

Rose Rates Hike : गुलशनाबादमध्ये प्रेमाच्या प्रतीकास महागाईचे काटे! गुलाबाचे दर भीडले गगनाला

जुने नाशिक : एके काळच्या गुलशनाबाद शहरास प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाच्या फुलास महागाईचे काटे टोचत आहे. व्हॅलेंटाइन डे सप्ताहात गुलाबाचे दर आकाशाला भिडले आहे. दोन ते तीन रुपयांना मिळणारे फूल दहा ते वीस रुपयास मिळत आहे. (Rose Rates Hike on eve of valentines Inflation forks symbol of love nashik news)

तरुण-तरुणी विशेषतः महाविद्यालयीन, तसेच प्रेमियुगल प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन डेची आतुरतेने वाट पाहतात. मंगळवारी (ता. १४) संपूर्ण जगात व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. महाविद्यालयात व्हॅलेंटाइन डे सप्ताह साजरा होत आहे.

सप्ताहात विविध डे साजरे होत आहे. या सर्व डेमध्ये एक वस्तू कॉमन आहे. ती म्हणजे गुलाबाचे फूल. गुलाबाच्या फुलास प्रेमाचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे व्हॅलेंटाइन डे सप्ताहात विशेषतः व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी गुलाबाच्या फुलास मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते.

सध्या व्हॅलेंटाइन डे सप्ताह सुरू आहे. तर मंगळवारी व्हॅलेंटाइन डे साजरा होणार आहे. त्यानिमित्त गुलाबाच्या फुलांची प्रचंड मागणी वाढली आहे. याशिवाय लग्नसराई जोरात असल्याने फुलांच्या मागणीत अधिकच वाढ झाली आहे.

गुलाबाच्या फुलांचे दर आकाशाला भिडले आहे. साधे २ ते ३ रुपयात मिळणारे गुलाबाचे फूल १० ते २० रुपयात मिळत आहे. तर उच्च दर्जाचे असलेले पॉलिहाऊसमधील गुलाबाचे २५ ते ३० रुपयापर्यंत मिळत होते. सध्या ४० ते ५० रुपयापर्यंत विक्री होत आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

फुलाची टंचाई

नाशिक शहर एकेकाळी चौही बाजूने गुलाबाच्या फुलांच्या शेतीने व्यापलेले होते. शहरात सध्याचे वडाळा गाव आणि अशोकस्तंभ परिसरात मोठ्या प्रमाणावर गुलाबाची शेती होती. शहराचे नावही गुलशनाबाद पडले होते.

सध्या याच गुलशनाबादला फुलांची टंचाई भासत आहे. थंडीचा परिणाम आणि बाहेर राज्यात निर्यात यामुळे फुलांची आवक घटली आहे. त्यात सध्या व्हॅलेंटाइन डे सप्ताह सुरू असल्याने फुलांची मागणी वाढली आहे.

त्या प्रमाणात आवक होत नसल्याने फुलांचे दरदेखील वधारले आहे. व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी साधे फूल तीस ते पन्नास रुपयापर्यंत, तर पॉलिहाऊसमधील फूल शंभर रुपयापर्यंत विक्री होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

असे आहे दर (प्रतिनग)

साधे फूल १० ते २०

पॉलिहाऊस फूल ४० ते ५०

फुलांचे बंडल

साधे फुलांचे बंडल १२ नग ६० ते ८०

पॉलिहाऊस फुलांचे बंडल २० नग ९०० ते १ हजार

"फुलांची आवक घटली आहे. तर, दुसरीकडे लग्नसराई आणि व्हॅलेंटाइन डे सप्ताहामुळे मागणी वाढली आहे. त्यामुळे दरांमध्ये ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे." - कुणाल गायकवाड, विक्रेता

टॅग्स :Valentines DayNashik