Water Crisis : ऐन उन्हाळ्यात लांबले गिरणाचे आवर्तन! पाणीटंचाईची शक्यता

Water scarcity
Water scarcityesakal

Water Crisis : वारंवार विस्कळीत होणाऱ्या ५६ खेडी नळपाणी पुरवठा योजनेतून शहरासाठी देण्यात येणाऱ्या आवर्तनाचा कालावधी वाढल्यामुळे नांदगाव शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पाश्‍र्वभूमीवर पालिका मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना पत्र देत गिरणा धरणातील योजनेतून नियमित तत्काळ शुध्द पाणी पुरवठा करण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे. (rotation of girna prolonged in summer Possibility of water shortage nashik news)

गेल्या पंधरवड्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि वाढत्या उष्णतेमुळे दहेगाव धरणातले पाणी ढवळून निघाले होते. त्यामुळे शहरातील काही भागात पिवळसर, गढूळ व दुर्गंधी युक्त पाणीपुरवठा झाला होता.

यावर तोडगा म्हणून मुख्याधिकारी श्री. धांडे यांनी लक्ष वेधत दहेगाव योजनेत शुद्धीकरणाची प्रक्रिया सद्यःस्थितीत तोकडी पडली आहे. त्यामुळे गिरणा धरण ५६ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून शहरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे असे कळविले आहे.

शहरातील राजकीय व सामाजिक संघटना शुद्ध पिण्याचे पाणी तत्काळ मिळावे अशी मागणी करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान उन्हाळ्याची तीव्रता एकीकडे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गिरणा धरणावरील ५६ खेडी नळपाणी पुरवठा योजनेतून करण्यात येणार पाणी पुरवठा गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने विस्कळित बनला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Water scarcity
Nashik News : मालेगावला वधू-वराचे हेलिकॉप्टरमधून आगमन; परिसरासह कसमादेतील पहिलीच घटना

कधी जॅकवेलचे उपसा करणारे व्हीटी पंप नादुरुस्त होणे तर कधी मुख्य जलवाहिन्यांवर दाब पडल्याने त्या फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी होणे यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे जलवाहिन्या जुन्या झाल्याची सबबपुढे करीत त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.

१० दक्षलक्ष घनफूट उपासा गरजेचा

गिरणा धरण उद्भव विहिरीतून दररोज १० दशलक्ष पाण्याचा उपसा झाला पाहिजे. मात्र तो तेवढ्या प्रमाणात होत नाही. प्रत्यक्षात मिळणारे पाणीसह ते सात दशलक्ष एवढेच पाण्याचा डिस्चार्ज मिळत असल्याने नांदगाव शहरासाठीचे आवर्तन लांबत असल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसून आले आहे.

विशेष म्हणजे शहरासह लगतच्या खेड्यांना देखील गिरणाचे पाणी महिनाभरात एकदा मिळत आहे.

Water scarcity
Nashik News : परसबागांमधून शाळा मिळवतात ताजा भाजीपाला! जिल्ह्यातील अनेक शाळांचा सहभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com