गोदावरीच्या लाटांवर खेळणारा नाशिकचा तेजस गडदे आता सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहे. रोइंग या नौकानयन क्रीडाप्रकारात अल्पावधीतच लक्षवेधी कामगिरी करत तेजस सध्या जर्मनी येथे सुरू असलेल्या एफआयएसयू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे नाशिककरांच्या अपेक्षा आणि देशाचा अभिमानही उंचावला आहे.