RSS Celebrates 100 Years
sakal
नाशिक: विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गुरुवारी (ता. २) शहरात २१ ठिकाणी पथसंचलन करण्यात येणार आहे. तसेच विविध १५४ ठिकाणी शस्त्रपूजन उत्सव पार पडणार आहे. यामध्ये ११ हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी होतील. संघ स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने यंदाचे पथसंचलन व कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे.