Rudraksh Mahotsav : मालेगावसह जिल्ह्यातून हजारो वाहनांचे सिहोरसाठी आरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandit Pradip Mishra

Rudraksh Mahotsav : मालेगावसह जिल्ह्यातून हजारो वाहनांचे सिहोरसाठी आरक्षण

मालेगाव (जि. नाशिक) : पंडीत श्री प्रदीप मिश्रा यांच्या सिहोर (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या रुद्राक्ष महोत्सवासाठी मालेगावसह नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांचे आरक्षण करण्यात आले आहे. १६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सव होईल.

महोत्सवात सहभागी भाविकांना रुद्राक्षाचे वाटप केले जाणार आहे. मालेगाव येथील शेकडो शिवभक्त भाविकांच्या सेवेसाठी जाणार आहेत. सेवेकऱ्यांची वाहने १५ फेब्रुवारीला सकाळी सिहोरकडे रवाना होतील.

शहरासह कसमादेतील ७० टक्के खासगी वाहने सिहोरला जाण्यासाठी आरक्षित करण्यात आली आहेत. (Rudraksh Mahotsav Reservation of thousands of vehicles from the district including Malegaon for Sehore nashik news)

पंडीत श्री प्रदीप मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा मालेगावला २२ ते २९ डिसेंबर या कालावधीत येथील मसगा कॉलेज मैदानावर झाली होती. कथेला मालेगाव पंचक्रोशीसह राज्यभरातील लाखो भाविक आले होते. शिवभक्तांच्या सेवेबाबत पंडीत प्रदीप मिश्रा यांनी मालेगावकरांचे कौतुक केले होते.

सिहोर येथे होणाऱ्या रुद्राक्ष महोत्सवास येवून शिवभक्तांच्या सेवेचे साकडे पंडीतजींनी मालेगावकरांना घातले होते. त्यानुसार येथील पुण्यश्री महाशिवपुराण कथा समितीतर्फे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जात आहे.

महिन्यापासूनच शेकडो वाहने आरक्षित करण्यात आली आहेत. काही भाविक सोयीनुसार जाणार असून लहान-मोठी असंख्य वाहने आरक्षित झाली आहेत. मालेगाव व नाशिक शहरातून सर्वाधिक वाहने आरक्षित करण्यात आली आहेत. हजारो वाहने व शिवभक्त सात दिवसाच्या रुद्राक्ष महोत्सवासाठी सिहोरला जाणार आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

पंडीत श्री प्रदीप मिश्रा यांच्या मालेगावातील श्री शिवमहापुराण कथेनंतर जिल्ह्यासह खानदेशमधील शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ‘एक लोटा जल, सारी समस्यांओ का हल’ या पंडित यांच्या उपदेशाचे पालन केले जात आहे.

शिवमंदिरांमध्ये भल्या पहाटेपासून महादेवाला जल व बेलपत्र अर्पण करण्यासाठी गर्दी होत आहे. सिहोर येथील रुद्राक्ष महोत्सवाला जाण्यासाठी गावागावातून नियोजन केले जात आहे.

"मालेगावातील पुण्यश्री महाशिवपुराण कथा समितीतर्फे व पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाशे सेवेकरी सात दिवसासाठी सिहोरला जाणार आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्य ग्रुपच्या साडेचारशे महिला व दीडशे तरुण सेवेसाठी सहभागी होतील. सेवेकऱ्यांची वाहने १५ फेब्रुवारीला सकाळी पाचला कॉलेज मैदानावरुन सिहोरकडे मार्गस्थ होतील. या संदर्भात सिहोर येथील श्री विठ्ठलेश सेवा समितीशी संपर्क झालेला आहे."

- देविदास पाटील, प्रमुख श्री शिवाय नमस्तुभ्य ग्रुप, मालेगा

टॅग्स :MalegaonNashikRudraksha