यंदाही गणेशोत्सवात कडक निर्बंध; 'अशी' असेल मंडळांसाठी नियमावली

Ganesh Festival
Ganesh Festival

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवांवर महापालिकेने बंधने घालण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक मंडळांना चार, तर घरगुती गणेशोत्सवासाठी दोन फुटांचीच मूर्ती बंधनकारक असून, गर्दी जमविणारे कार्यक्रम घेता येणार नाही. सार्वजनिक मंडळांना एक महिना अगोदर मंडपासाठी परवानगी घ्यावी लागणार असून, ऑनलाइन परवानगीसाठी संकेतस्थळावर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (rules for ganesh mandals have been announced in this year ganeshotsav festival 2021)

गेल्या वर्षी कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोना संसर्गाचा वेग उच्चतम पातळीवर असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले गेले. ऑनलाइन परवानगी बंधनकारक करण्यात आली. या वर्षीदेखील गेल्या वर्षाप्रमाणेच नियम लागू राहणार आहेत. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे, नियमानुसार मंडप उभारणे, सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीची उंची चार फूट, तर घरगुती गणपती मूर्तीची उंची दोन फूट असावी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीएवजी शाडूची मूर्ती किंवा धातू किंवा संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, सार्वजनिक ठिकाणी मूर्तीचे विसर्जन न करता घरगुती किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करावे. स्वच्छेने वर्गणी वसूल करावी, जाहिरातीचे अधिक प्रदर्शन करू नये, आरोग्य व सामाजिक संदेशाच्या जाहिरातींना प्राधान्य द्यावे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे न करता आरोग्यविषयक रक्तदान शिबिर, कोरोना, मलेरिया, डेंगी, चिकूनगुनिया आजारांना प्रतिबंध घालणारे जनजागृतीपर कार्यक्रम घेणे आदी नियमांचा समावेश आहे.

Ganesh Festival
नाशिक : पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी पालिका उच्च न्यायालयात

मंडपांसाठी ऑनलाइन परवानगी

सार्वजनिक मंडळांना मंडप उभारण्यासाठी एक महिना ऑनलाइन परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. मंडप धोरणात रस्त्यांवर खड्डे न करता खांब रोवण्यासाठी वाळूचे ड्रम वापरावेत, मंडपापासून पंधरा मीटरवर रोषणाई करावी, स्थळ पाहणीनंतर परवानगी देणे, मंडपासाठी परवानगी घेताना स्थळदर्शक नकाशा, धर्मादाय उपायुक्तांचे नोंदणीपत्र, पोलिस, वाहतूक, अग्निशमन या तीन विभागांचा ना हरकत दाखला बंधनकारक करण्यात आला आहे. विनापरवाना मंडप उभारल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

Ganesh Festival
नाशिक : महिनाभरात डेंगीचे १९५, चिकूनगुनियाचे १८५ रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com