Saptashrungi Hill Marathon : सप्तशृंगी गड घाटात रविवारी धावणार धावपटू

Saptashrungi Hill Marathon
Saptashrungi Hill Marathonesakal

वणी (जि. नाशिक) : हिरव्यागार निसर्गसौंदर्याने बहरलेल्या आल्हाददायक व आदिमायेच्या भक्तीमय वातावरणात स्वंयभू शक्तीपीठ सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स आयोजित सप्तशृंगी हिल मॅरेथॉन २०२२ सहावे पर्व' रविवार ता. १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी संपन्न होत असल्याची माहिती श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे आणि नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी दिली. (Runners will run in Saptashrungi Gad Ghat on Sunday in Saptashrungi Hill Marathon 2022 Nashik Latest Marathi News)

सध्या व्यायामाप्रती जनसामान्यांत अधिकाधिक जागरूकता निर्माण होत असून धावण्याकडे जनतेचा कल वाढत चालला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्यविषयक जागरूकता अधोरेखित करण्याचा नाशिक रनर्स ग्रुपचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ही स्पर्धा २१ कि.मी. स्त्री/पुरुष, १० कि.मी. स्त्री/पुरुष व ५ कि.मी. स्फुत रन स्त्री/पुरुष अश्या प्रकारात होणार आहे.शिवाय ही मॅरेथॉन ग्रामीण भागात भरवली जाणार असल्याने या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखविण्याची संधी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन ही एक आगळीवेगळी मॅरेथॉन असून जास्तीतजास्त संख्येने लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी केले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू झाली असून ऑनलाइन बंद झाली असून ऑफलाइन नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिकमधील सर्व “आर्यनमैन" उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी विनोद गोल्हे. मो.९८२२२७४८९९ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मॅरेथॉन आयोजन व यशस्वीतेसाठी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स, नाशिक यांसह ग्रामपंचायत सप्तशृंगी गड व ग्रामपंचायत नांदूरी प्रयत्न करीत आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने नांदुरी ते सप्तश्रृंगी गड ही वाहतूक सेवा सकाळी ६ ते ९:३० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील, याची नोंद घ्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Saptashrungi Hill Marathon
Political : 37 वर्षानंतर मशाली पेटल्या; शिवसैनिकांच्या 85च्या आठवणी ताज्या

असे असेल 'सप्तशृंगी हिल मॅरेथॉन'

1.गडाचा पायथा नांदुरी गाव येथून स्पर्धेला सुरुवात

2.२१ किमी साठी नांदुरीगाव ते शिवालय तिर्थ आणि पुन्हा परत तसेच १० किमी साठी मंकी पॉईंट व परत असा मार्ग

3.स्पर्धेचे अंतर २१ किमी व दहा किमी

4. हौशी धावपटूंसाठी ०५ किमी अंतराचे डिव्हाइन रन

5.शर्यतप्रसंगी गडावर जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार वेळ सकाळी सहा ते साडे नऊ

6.धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी आदिवासी लोकनृत्ये आणि नाशिक ढोलचे आयोजन

7. स्पर्धकांची आरोग्यविषयक सुरक्षा म्हणून जागोजागी रुग्णवाहिकांसह डॉक्टरांची टीम उपलब्ध

Saptashrungi Hill Marathon
Sakal Exclusive : शालेय पोषण आहारचा भार प्रभारीवर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com