Latest Political News | 37 वर्षानंतर मशाली पेटल्या; शिवसैनिकांच्या 85च्या आठवणी ताज्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

1985 Shivsainik election sign mashal

Political : 37 वर्षानंतर मशाली पेटल्या; शिवसैनिकांच्या 85च्या आठवणी ताज्या

नाशिक : शिवसेनेला मशाल निवडणूक चिन्ह मिळाल्याने आज (ता.११) ठिकठिकाणी मशाली पेटवून नाशिकच्या शिवसैनिकांच्या १९८५ च्या आठवणी जागवल्या. विधानसभेच्या १९८५ च्या निवडणुकीत मशाल चिन्ह मिळाले. (After 37 years mashal election sign Memories of Shiv Sainik from 1985 nashik Latest Political News)

हेही वाचा: Nashik Bytco Hospital : बिटको रुग्णालयात आता शासकीय दरानुसार चाचण्या

नाशिकला तेव्हा नाशिक शहर आणि देवळाली अशा दोन मतदार संघात शिवसेनेने निवडणुका लढविल्या होत्या. नाशिक शहर मतदार संघात तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत केशवराव थोरात तर देवळाली मतदार संघातून माजी मंत्री शिवसेनेचे विद्यमान उपनेते बबनराव घोलप हे मशाल चिन्हावर निवडणूक लढले होते. दरम्यान आज पुन्हा ३७ वर्षानंतर शिवसैनिकांनी शालिमार येथील शिवसेना कार्यालयासमोर सायंकाळी साडेसहाला नव्याने निवडणूक आयोगाने दिलेले निवडणूक चिन्ह असलेल्या मशाली पेटवून पुन्हा निवडणुकीचा बिगूल फुंकला.

हेही वाचा: New Number Series : तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु