नाशिक : धावत्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने 30 प्रवासी बचावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIRE

नाशिक : धावत्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने 30 प्रवासी बचावले

सिन्नर (नाशिक) : नाशिकहुन प्रवाशांना घेऊन कोल्हापूरकडे जाणाऱ्या खाजगी आराम बसला नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळच्या मोहदरी घाटात आग लागल्याची घटना रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 30 प्रवासी बचावले असून. या दुर्घटनेत प्रवाशांच्या सामानासह बस जळून खाक झाली .

नाशिकहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन लॅबेक ट्रॅव्हल्स कंपनीची वातानुकूलित लक्झरी बस (No. MH09 / CV3069) च्या AC मध्ये बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्लीपर कोच असलेल्या या बसमध्ये ३० प्रवासी होते. सिन्नर जवळच्या मोहदरी घाटात आल्यावर बसच्या एसीमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान राखत बस घाटातच रस्त्याच्या कडेला नेली. यानंतर प्रवाशांना एक-एक करत गाडीपासून दूर जाण्याचे आवाहन त्यांनी केले. याच दरम्यान आगीचा भडका होऊन संपुर्ण बस पेटली. प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर पडले असले तरी सामान मात्र गाडीच्या आतच राहिले होते. हे सर्व सामान आगीत जळून खाक झाले.

हेही वाचा: जळगाव : अपार्टमेंटच्या पार्किंगमधील वाहने पेटविली

घाटात बसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर नगरपालिका व MIDC च्या अग्निशमन बबांनी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यत केवळ बसचा सांगाडा उरला होता. सिन्नर व MIDC पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही बाजूनी तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा: तरोडा नाका परिसरात गादी घराला आग

Web Title: Running Bus Fire 30 Passengers Rescued In In Sinnar Nashik Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikfirebus accident
go to top