Police Bharti
sakal
नाशिक: महाराष्ट्र पोलिस दलातील सुमारे १५ हजार रिक्त पोलिस शिपाईं पदासाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाईच्या २१०, पोलिस शिपाई चालकच्या ५१, तर कारागृह पोलिस शिपाई पदाच्या ११८, अशा एकूण ३८० रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.