Police Recruitment
sakal
नाशिक: छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत एक हजार ६०० मीटर धावण्याच्या प्रकारात धावताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आडगाव येथील ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावरही भरती प्रक्रिया सुरू असून, धावण्याच्या प्रकारात उमेदवारांना उन्हाचा त्रास होऊ नये, या अनुषंगाने पहाटेच्याच वेळेमध्ये एक हजार ६०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येत आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीसाठी मैदानावरच वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे.