नाशिक- होळीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी, पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यातून शेकडो आदिवासी गत चार पाच दिवसांपासून गोदाघाटावर दाखल झाले आहेत. यातील अनेकांकडे बिघा दोन बिघा तर काहींकडे इंचभरही शेतजमीन नसल्याने त्यातील अनेकांची उपजीविका केवळ होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या विक्रीवरच सुरू आहे. ग्रामीण भागात अद्यापही संपूर्ण गावकरी एकत्र होळी साजरी करतात.