esakal | "कहीं खुशियॉं तो कहीं गम.."कोरोनामुळे अनेकांची ईद दुःखात 
sakal

बोलून बातमी शोधा

ramdan.jpg

अनेकांचे अख्खे कुटुंब कोरोनाबाधित होऊन रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या बहुतांश कुटुंबीयांच्या घरांना टाळे लागले आहे. याचे बोलके चित्र मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाले.

"कहीं खुशियॉं तो कहीं गम.."कोरोनामुळे अनेकांची ईद दुःखात 

sakal_logo
By
युनूस शेख :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यंदाची रमजान ईद कोरोनाच्या सावटाखाली "कहीं खुशियॉं तो कहीं गम' अशा वातारणात मुस्लिम बांधवांकडून साजरी करण्यात आली. अनेकांच्या नातेवाईक, कुटुंबीयांचा कोरोनाशी लढा देताना मृत्यू झाला, तर अनेक जण रुग्णालयात कोरोनाशी दोन हात करत असल्याचे चित्र मालेगावसह शहरातही बघावयास मिळाले. 

कुणाच्या डोळ्यात अश्रू, तर कुणाच्या डोळ्यात आनंद
अनेकांचे अख्खे कुटुंब कोरोनाबाधित होऊन रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या बहुतांश कुटुंबीयांच्या घरांना टाळे लागले आहे. याचे बोलके चित्र मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाले. जुने नाशिक येथील नाईकवाडीपुरा भागातील संपूर्ण कुटुंब बाधित झाल्याने त्यांचे घर रमजान ईदच्या दिवशी बंद होते. वडाळागाव येथेही अनेक जण बाधित आढळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारी घेत त्यांच्या कुटुंबीयांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अडकलेले 208 मुस्लिम बांधव तब्बल अडीच महिन्यांनंतर घरी परतल्याने त्यांना कुटुंबीयांबरोबर ईद साजरी करता आली. त्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रू, तर कुणाच्या डोळ्यात आनंद बघावयास मिळाला. 

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई