''सरकारी तिजोरीवर मविआ सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकतयं'' - सदाभाऊ खोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadabhau Khot

''सरकारी तिजोरीवर मविआ सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकतयं'' - सदाभाऊ खोत

नाशिक : जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान आम्ही सुरू केलंय. कोरोना (Corona) काळ संपला असला तरी मात्र अद्याप सरकारचा कोरोना संपत नाहीये. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहेत. हा दरोडा लपविण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकार कष्टकरी वर्गाचे चेष्टा करत आहे - खोत

खोत म्हणाले पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अद्याप मिळाले नाही. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यावर 10 हजार भरणार हे आश्वासन देण्यात आले होते. 10 हजार तरी सोडा शेतकऱ्यांची वीज आता सरकार कापत आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार यांनी सांगितले होते. सरकार कष्टकरी वर्गाचे चेष्टा करत आहे. दूध, कांद्याचा प्रश्न गंभीर झाला आहे याकडे सरकार लक्ष देत नाही. सरकार विरोधात जो बोलेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच काम सध्या सुरू आहे. सत्तेत असताना तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता तुम्ही काय औरंगजेबचे अवलाद आहे का? अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली.

कांद्याला 5 रुपये वाहतूक अनुदान सरकारने तातडीने दिले पाहिजे. कष्टकऱ्यांच्या अशाच सर्व प्रश्नांवर आम्ही ही जागर यात्रा सुरू केलीय. येत्या 18 तारखेला सोलापूर जिल्ह्यातील माढा मध्ये होणार आहे असेही ते म्हणाले.

शरद पवारांवर टीका

महाराष्ट्रातल सरकार सध्या बारामती वरून चालतंय. मराठा आरक्षण देखील बारामतीकरांनी घालवलं. मराठा समाजाचा वाटोळ या बारामतीकरांनी केलंय. राज्याच वाटोळ या पवार अँड पवार कंपनीने केलंय. राज्याला आता पवार यांच्यापासून वाचवण्याची वेळ आली आहे अशी खोचक टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली.