
'कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाही हे दुर्देव'
पवार कंपनीपासून राज्याला वाचवण्याची हीच वेळ - खोत
राज्याचे पवार आणि पवार कंपनीने वाटोळे केले आहे. या राज्यास आता पवारांपासून वाचवण्याची वेळ येऊन ठेपली असून राज्यातील सरकार सध्या बारामती (baramati) वरून चालतं असल्याची खरमरीत टीका आज नेते सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केली आहे. सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांचे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा (Jagar Shetkaryancha Aakrosh Maharashtracha) हे राज्यव्यापी अभियान सुरु आहे. ते आज नाशिक (nashik) येथे आले असता त्यांनी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (sadabhau khot latest marathi news)
हेही वाचा: 'असनी' चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल, सावधानतेचा इशारा
यावेळी खोत यांनी शेतकऱ्यांना आंदोलन केले. ते म्हणाले, जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान आम्ही सुरू केले आहे. त्यातून शेतकऱ्यांचा राज्य सरकारवरील रोष आणखी कळत आहे. कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना (corona) संपत नाही हे दुर्देव आहे. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दराडो लपवण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे.
पुढे शिवसेनेवर टीका करत ते म्हणाले, शिवसेनेची (shivsena) सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचे दहा हजार भरणार हे आश्वासन देण्यात आले होते. दहा हजार सोडा शेतकऱ्यांची वीज सरकार कापू लागले आहे. दूसरीकडे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला आहे. पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) ५० हजार रुपये अद्याप दिलेले नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल, असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: मी बापट असलो तरी अंकुश काकडे पोपट; भाजप नेत्याचा पवारांना सल्ला
Web Title: Sadabhau Khot Criticized On Sharad Pawar Jagar Shetkaryancha Akrosh Morcha In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..