Sadmohammed Patel : निफाडचा सादमोहम्मद ठरला जलक्रीडापटू; ऑल इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकावर कोरले नाव

Saddamohammad’s Journey to Success in Kayaking : निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सादमोहम्मद जाहिरअली पटेल याने जलक्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके पटकावली आहेत.
Sadmohammed Patel
Sadmohammed Patelsakal
Updated on

मूळचा आहेरगाव (ता. निफाड) येथील सादमोहम्‍मद हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहे. इतर मुलांप्रमाणे त्याचेही शालेय जीवन खेळत-बागडत पूर्ण झाले. महाविद्यालयीन जीवन त्‍याच्‍या संपूर्ण करिअरला कलाटणी देणारे ठरले. इयत्ता अकरावीत प्रा. हेमंत पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली तो पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयाशी संलग्‍न बोट क्‍लबशी जोडला गेला. गेल्‍या सात वर्षांपासून खेळताना त्‍याने विविध स्‍पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com