Nashik News : अंनिस कायदा रद्द करण्यासाठी साधू- महंतांचे रामतीर्थावर आंदोलन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadhu Mahant, priests and officials of Hindu Dharma Association etc. were shouting loud slogans.

Nashik News : अंनिस कायदा रद्द करण्यासाठी साधू- महंतांचे रामतीर्थावर आंदोलन!

पंचवटी : अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा धाक केवळ हिंदू साधू- महंत यांनाच दाखवला जातो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने अंनिस कायदा रद्द करावा. या मागणीसाठी शहरातील साधू- महंत यांनी सोमवारी (ता.२३) दुपारी दोन वाजता रामतीर्थावर आंदोलन केले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या वेळी त्र्यंबकेश्वर येथील जुना आखाड्याचे महंत हर्षदभारती, महंत सुधीरदास पुजारी, अनिकेतशास्त्री देशपांडे, गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, काळाराम मंदिर विश्वस्त धनंजय पुजारी, हिंदू एकता आंदोलनाचे रामसिंग बावरी, लव जिहाद संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष गजू घोडके आदी उपस्थित होते.

अंनिस कायदा केवळ हिंदू धर्मातील साधू- महंत यांच्यावरच लागू होताना दिसून येत आहे. परंतु मौलाना, पाद्री, भन्ते आदी जादूटोणा करत असताना, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने अंनिस समिती बरखास्त करावी.

तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा. यापुढे असा पाखंडीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मौलाना, पाद्री, भन्ते यांनी आपली दैवी शक्ती सिद्ध करावी आणि ५१ लाख रुपयांचा धनादेश घेऊन जाण्याचे खुले आव्हान अनिकेतशास्त्री यांनी या वेळी केले.

हेही वाचा: Nashik News : भररस्त्यात विद्यार्थ्यावर गावगुंडाकडून शस्त्राने वार