सातपूर- अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल असलेला भाजप पदाधिकारी सागर वैष्णव याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी आता सातपूर पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात याच परिसरातील एकाच कुटुंबातील अवैध दोन महिला सावकार व दोन अवैध पुरुष सावकारांना अटक करत बेड्या ठोकल्याच्या घटनेला उजाळा मिळाला आहे.